खान्देशगुन्हेजळगांव

साडीने पेट घेतल्याने वृद्धेचा जळून मृत्यू

जळगावः सकाळच्या सुमारास थंडी असल्याने शेकोटी पेटवलेली असतांना वृद्धेच्या साडीने पेट घेतल्याने बायजाबाई वामन सोनवणे (वय ७१, रा. साईपॅलेस निमखेडी) यांचा जळून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील निमखेडी येथे बायजाबाई सोनवणे या वृद्ध महिला मुलगा, सून आणि नातवंडे यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. थंडीचे दिवस असल्याने बुधवार दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता त्या घराच्या पुढच्या हॉलमध्ये शेकोटी करून बसलेल्या होत्या. त्यावेळी अचानक त्यांच्या
साडीच्या पदरला आग लागल्याने त्यात त्या गंभीरित्या भाजल्या गेल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवार दि. १८ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला . . त्यांच्या पश्चात जगदीश आणि अशोक हे दोन मुले, विवाहित मुलगी, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर महाजन हे करीत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button