नवी दिल्ली ;-पाच वर्षीय मुलाला कँसर असल्याने तो बरा व्हावा यासाठी एका पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या आईने त्याला गंगा नदीत बुडवून ठेवल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हरिद्वार येथे बुधवारी उघडकीस आली असून याबाबत सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अंधश्रेधातून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. अत्यंत आजारी असलेल्या मुलाच्या पालकांनी “चमत्कारिक उपचार” या आशेने त्याला पुन्हा पुन्हा गंगेत बुडविले. कुटुंबाने मुलाची हत्या केली. हरिद्वारच्या हर की पौरीमध्ये ही घटना घडली.
ब्लड कैंसर पीड़ित बच्चे को गंगा में डुबोकर मार डाला-
दर्दनाक वीडियो हरिद्वार में हरकी पैड़ी का है। लाइलाज घोषित हुए बच्चे को परिजन हरिद्वार ले गए। आरोप है कि बच्चे को उन्होंने कई मिनट तक पानी में डुबोए रखा। पिता राजकुमार सैनी, मां शांति, मौसी सुधा पुलिस कस्टडी में हैं। pic.twitter.com/twu9tkTFAF
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) January 24, 2024
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला जिल्हा रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
गंगेत डुबकी मारल्याने तो बरा होईल या आशेने त्यांच्या अंधश्रद्धेने कुटुंबाने मुलाला हरिद्वारला नेले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांना मात्र कुटुंबाच्या वागण्यावर संशय आला आणि एकच गोंधळ उडाला.
पोलीस अधीक्षक (शहर) स्वतंत्र कुमार सिंह यांच्या म्हणण्यानुसार, हे जोडपे रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आपल्या मुलाला हरिद्वारमधील गंगा नदीत डुबकी मारण्यासाठी घेऊन आले होते. मुलाच्या पालकांनी खुलासा केला की त्यांनी सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांचा सल्ला घेतला होता, परंतु डॉक्टरांनी मुलाला सोडून दिले होते.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.