खान्देशजळगांव

जळगावात एमपीजेचे सर्वसमावेशक विकासाच्या मुद्द्यांवर ११ रोजी अधिवेशन

जळगाव ;- महाराष्ट्र मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर (एम्पीजे ) तर्फे येत्या ११ रोजी जळगावातील छत्रपती संभाजी राजे नाट्यसंकुलात १ ते ५ यावेळेत राष्त्री अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती आज पत्रकारपरिषदेत आरिफ देशमुख यांनी दिली. सर्वसमावेशक विकासाच्या मुद्द्यांवर हे अधिवेशन होणार आहे. सर्वसमावेशक विकासाच्या महत्वाबद्दल जागरूजता वाढविण्याकरिता समाजातील सर्व वर्गाना विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्टय साध्य करण्यासाठी हे अधिवेशन असल्याचे देशमुख यांनी सांगितले . वित्त सचिव आबिद शेख ,अजीम पाशा आदी उपास्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button