खान्देशगुन्हेजळगांव

१५ लाखाच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

जळगाव ;- माहेरहून पंधरा लाख रुपये आणावे लागतील नाहीतर तुला नांदवणार नाही असे सांगून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळगाव येथील वाघ नगरातील संस्कार कॉलनीत माहेर असलेल्या समीक्षा योगेश देशमुख वय 27 यांना लग्न झाल्यानंतर माहेरहून 15 लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा
15 जुलै 2021 ते 8 जुलै 2023 पर्यंतशारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार समीक्षा देशमुख यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला दिली. पती योगेश सतीश देशमुख, सासरे लतिष देशमुख, सासू सीमा लतीश देशमुख, आणि ननंद ज्ञानदा देशमुख सर्व राहणार मोरोपंत जोशी कॉलनी अमरावती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना प्रशांत पाठक करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button