महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषदतर्फे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
जळगाव ;- महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष अब्दुल शकूर देशपांडे यांनी कार्यकारी अभियंता जळगाव विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित यांना निवेदन दिले
सिटी कॉलनी, लक्ष्मी नगर, गेंदालाल मिल. भागात वारंवार लाईट बंद होत असून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे .
आणि रमजान महिन्यानिमित्त रोजेदारांना समस्या अडचणींचा सामना कारवा लागत असून हि समस्यां मार्गी लावण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषदतर्फे कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे . निवेदनात म्हटले आहे कि,
आमच्या भागात लाईटची समस्या झालेली आहे व मुलांचे 10/12पेपर चालू आहे दिवस-रात्र लाईत बंद असल्याने मुलांना अभ्यास करताना बराच त्रास होत आहे तसेच लाईट बंद असल्याने बरेच मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच. रमजाननिमित्त मुसलमान बांधवाना सायंकाळी रोजे सोडण्यास अडचणी निर्माण होत आहे . तरी निवेदनाची दखल घेऊन समस्यां मार्गी लावावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.