खान्देश टाइम्स न्यूज l ०४ ऑगस्ट २०२४ l भुसावळ शहरात चोरीच्या दोन दुचाकी घेवून फिरणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अल्तमस गणी तडवी (वय २४, रा. मुस्लीम कॉलनी, बिस्मील्ला नगर, भुसावळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
जळगाव जिल्हयांत मोठ्या प्रमाणात मोटार सायकल व सायकल चोरीचे गुन्हे होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना बबन आव्हाड यांना योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे अधिनस्त पोहेकॉ कमलाकर बागुल, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, पोना/रणजित जाधव, पोकॉ/सचिन पोळ अशा पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले. त्यांनी दुचाकी चोरीबाबत माहिती काढली. मोटार सायकल चोरी करणारा आरोपी यांचे भुसावळ शहरातील शोध घेत असतांना संशयीत आरोपी अल्तमस गणी तडवी (वय २४, रा. मुस्लीम कॉलनी, बिस्मील्ला नगर, भुसावळ) याचे कडेस दोन मोटार सायकली चोरीच्या असल्याची माहिती मिळाली.
त्याचा भुसावळ शहरात शोध घेतला असला तो भुसावळ शहरात राहत असलेल्या परिसरात मोटार सायकल क्र (एमएच ३० बीएच ८००२) हि चोरीची असून तो सदर मोटार सायकल घेवून फिरत होता. त्यास ताब्यात घेवून त्याचे घरुन पुन्हा एक चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली असून सदर दोन्ही मोटार सायकली बाबत जळगाव तालुका पो.स्टे. व अडावद पो.स्टे. येथे गुन्हे दाखल आहेत. संशयित आरोपी अल्तमस गणी तडवी याला जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.