सामाजिक

सावदा येथील चांदनी चौक मुस्लिम समाजाच्या युवा मंच कमेटीचा वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

सावदा l १५ ऑगस्ट २०२४ l येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सावदा येथील मुस्लिम डॉक्टरांना तसेच नवनर्वचित रुजू झालेले सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या व डॉ. हाजी हारून तसेच सी ई वो जफर अली, सादिक मिस्त्री व माजी नगरसेवक गुड्डू, ऊर्फ अलबक्ष या सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व मुस्लिम डॉक्टर यांनी शाळा करी लहान मुला मुलींना बिस्किटे चॅवकलेट वाटले नंतर कार्यक्रम सूरु असतांना पोहे चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. मुस्लिम समाजाच्या जेष्ठ पत्रकार युसुफ शाह व पत्रकार फरिद शेख यांच्या सुध्दा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ हाजी हारून हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सावदा पोलिस स्टेशनचे सह पोनी. विशाल पाटील सर हे होते तसेच सर्व मुस्लिम समाजाच्या डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानित करण्यात आलेल्या डॉक्टरांचे नांवे असे डॉ अन्सार, डॉ . शोएब, डॉ वसीम, डॉ हमीद शेख, डॉ लियाकत कुरैशी, डॉ नासीर खान. डॉ अय्युब खान सुत्रसंचलन समद शेख गुलाब यांनी केले तर आभार प्रदर्शन निसार शेख नबी यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन चांदनी चौक मुस्लिम युवा कमेटी यांनी केले होते.

निसार शेख, समद शेख, कलिम जनाब, सौकत खान, मोईन लाला, शाहिद शब्बीर, मोहसीन खान, जुनैद शेख, राशीद बागवान, वसीम खान, गुलाम नबी, नईम खान यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button