राजकीयजळगांव

आमदार राजूमामा भोळे उद्या सोमवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार

खान्देश टाइम्स न्यूज l २७ ऑक्टोबर २०२४ l जळगाव l जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झाले आहेत. महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार सुरेश भोळे उद्या दि. २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहील.

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून इच्छूक उमेदवारांनी अर्ज घेतले आहे. ठरलेल्या मुहूर्तानुसार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया दि. २३ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून २९ ऑक्टोबरपर्यत अर्ज दाखल करू शकतात. भाजपतर्फे २८ रोजी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

महायुतीतील भाजप उमेदवारांचे दि. २८ रोजी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात येईल. मंडळ अध्यक्षासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अर्ज भरतांना हजर राहणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button