जळगाव:- विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असणाऱ्या जळगाव आणि चाळीसगाव येथील दोन रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून या दोन्ही गुन्हेगारांची कोल्हापूर आणि नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा गुरुजीत सिंग सुजान सिंग बावरी व 24 राहणार सद्गुरु नगर सिरसोली नाका तांबापुरा याच्या विरुद्ध 11 गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी बावरी याच्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता त्यानुसार 29 रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्याला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस उपनिरीक्षक अशोक , योगेश बारी, किशोर पाटील, छगन तायडे,, किरण पाटील यांनी 29 रोजी ताब्यात घेऊन त्याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली.
तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा निखिल उर्फ भोला सुनील अजबे वय 23 राहणार लक्ष्मी नगर चाळीसगाव याच्याविरुद्ध नऊ गुन्हे दाखल आहेत. हा गुन्हेगार धोकादायक व्यक्ती असल्याच्या कारणावरून त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांनी तयार करून 18 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 29 रोजी एमपीडीए कायद्यानुसार अजबे याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी, सुभाष पाटील, योगेश मांडोळे, राहुल सोनवणे, समाधान पाटील, भूपेश वंजारी, नरेंद्र चौधरी, राकेश महाजण, पवन पाटील नितेश पाटील, आदींनी ताब्यात घेऊन त्याची नागपूर कारागृहात रवानगी केली. वरील दोघा गुन्हेगारांचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेश वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी संदीप गावित, उपविभागीय अधिकारी राजेश सिंह चंदेल, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सुनील पंडित दामोदरे, जयंत चौधरी, रफिक शेख कालू, संदीप चव्हाण, ईश्वर पाटील यांनी काम पाहिले.