जळगांव

ना.गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार “सर्वसमावेशक पिक विमा योजनेचा” प्रचार व प्रसार होण्यासाठी जिल्हाभरात जनजागृती रथ तयार

“सर्वसमावेशक पिक विमा योजनेचा” लाभ घेऊन १/- रुपयात विमा काढण्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन..

जळगाव २० जुलै २०२३ l शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत “सर्वसमावेशक पिक विमा योजना” ज्या मध्ये १/- रुपयात शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढता येणार असून शेतकऱ्यांची विमा हप्ता रक्कम देखील राज्य सरकार भरणार आहे. या महत्वपूर्ण योजनेच्या माध्यमातून  प्रतिकूल हवामान परिस्थिती (Mid Season Adversity), स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात पिकांचे नुकसान व उत्पन्नावर आधारित नुकसान  या सर्व बाबी करिता भरपाई मिळणार आहे. सदरिल योजनेच्या प्रचार व प्रसिद्ध जागृती रथाचे शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या सर्व खरीप मधील पिकांचा विमा काढून घेण्याचे आवाहन केले. या ठिकाणीजळगावमहानगर जिल्हाध्यक्ष सौ. उज्वलाताई बेंडाळे , जळगाव तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, जिल्हा परिषद माजी सभापती श्री.प्रभाकर सोनवणे, माजी उपमहापौर श्री.अश्र्विन सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मिलिंद चौधरी,नगरसेवक राजेंद्र घुगे, माजी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी,महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी भगिनी,भाजपचे सर्व पदाधिकारी तथा अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button