
अंदमान व निकोबार येथील ऐतिहासिक सेल्युलर जेलला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची भेट
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
अंदमान I प्रतिनिधी
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज अंदमान व निकोबार बेट येथील दौऱ्यानिमित्त भारत माताचे महान सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजांनी ज्या ऐतिहासिक कालापाणी सेल्युलर जेल मध्ये ठेवले होते तेथील कोठडीला भेट देऊन वीर सावरकरांना अभिवादन केले.
सेल्युलर जेल येथे भेट दिली असता स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपल्या वीर जवान व स्वातंत्र्यसैनिकांनी किती मोठे बलिदान दिले आहे याची प्रचिती येत असल्याचे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले
जय हिंद पदयात्रामध्ये रक्षाताई खडसे सहभागी
भारत मातेचे महान सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती निमित्त साजऱ्या होणाऱ्या पराक्रम दिवस निमीत्त आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज श्री विजय पुरम, अंदमान व निकोबार द्वीपसमूह येथे जय हिंद पदयात्रा मध्ये राष्ट्रीय सेवा योजना व माय भारत व्हालुंटियर सोबत सहभागी झाल्या.