सामाजिकजळगांव

सुरेशदादा जैन यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर (पहा व्हिडिओ)

खान्देश टाइम्स न्यूज l १४ नोव्हेंबर २०२३ l माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त युवाशक्ती फाऊंडेशन व मित्र परिवाराच्या वतीने बुधवार, दि.२२ रोजी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी ७, शिवाजी नगर, जळगाव येथे सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत “भव्य रक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे. या दिवसाला रक्तदान महासंकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

या रक्तदान शिबिराच्या फलकाचे अनावरण मंगळवार दि.१४ रोजी सुरेशदादा जैन, ज्येष्ठ विधितज्ज्ञ पद्मश्री उज्वल निकम, रत्नभाभी जैन यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मिनाक्षी जैन, राजेश जैन, शैलेश जैन, तृप्ती जैन, याचना जैन, ॲड.अनिकेत निकम, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचालित रक्तपेढीचे अध्यक्ष डॉक्टर प्रसन्न जैन, युवाशक्ती फाऊंडेशनचे संथपक अध्यक्ष विराज कावडीया, प्रकाश बेदमुथा, पियुष हसवाल, प्रीतम शिंदे, संकेत छाजेड, यश राठोड, शैलेंद्र राजपूत, तन्मय मनोरे, गौरव नलगे आदी उपस्थितीत होते.

या भव्य रक्तदान शिबिरात जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान अधिकाधिक तरुणांनी आणि नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन आपला रक्तदानाचा हक्क बजवावा असे आवाहन पद्मशी ॲड. उज्ज्वल निकम यांनी केला आहे.

पहा वव्हिडीओ…

video-output-5CC69003-145A-41C0-9AE0-669DAFA7907E

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button