इतर
तालिश खान यांना एम.एस्सी.आय.टी. (डेटा सायन्स) मध्ये प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह यश

तालिश खान यांना एम.एस्सी.आय.टी. (डेटा सायन्स) मध्ये प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह यश
मुंबई फैजान शेख ;– मीरा रोड (मुंबई) येथील तनवीर खान उस्मान खान यांचे सुपुत्र तालिश मोहम्मद खान यांनी गीतम विद्यापीठ, हैदराबाद येथून एम.एस्सी. आय.टी. (डेटा सायन्स) या पदवी अभ्यासक्रमात प्रथम श्रेणी विशेष प्राविण्यासह यश संपादन केले आहे.
तालिश यांनी एकूण ८.१० सीजीपीए मिळवून उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी केली असून विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक निकषांची यशस्वी पूर्तता केली. दिनांक १९ जुलै २०२५ रोजी त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.
तालिश खान यांचे यश पाहून मुंबईसह मुक्ताईनगर , भुसावळ, जळगाव आणि विविध भागांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





