
जळगावात सोन्याचे दर स्थिर, चांदीत तब्बल ३,५०० ची उसळी!
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील सुवर्णप्रेमी व गुंतवणूकदारांसाठी आजचे नवे दर जाहीर झाले असून, सोन्याचे भाव स्थिर राहिले असताना चांदीच्या किमतीत मोठी उसळी नोंदवण्यात आली आहे.
जळगाव व सावदा येथील नामांकित भंगाळे गोल्ड दालनात शुद्ध सोन्याची हमी, आकर्षक डिझाईनचे दागिने आणि पारदर्शक व्यवहार ग्राहकांना उपलब्ध होत आहेत.
आजच्या दरानुसार –
२२ कॅरेट सोनं : प्रति तोळा ₹१,००,९४५
२४ कॅरेट सोनं : प्रति तोळा ₹१,१०,२००
चांदी : प्रति किलो ₹१,२८,५०० (कालच्या तुलनेत तब्बल ₹३,५०० ने वाढ)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांत सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असली तरी आज चांदीच्या दरातील झपाट्याने झालेली वाढ लक्षवेधी ठरली आहे.
दरातील या चढउतारामुळे गुंतवणूकदारांमध्ये हालचाल वाढली असून, सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेकडे उत्सुकतेने पाहत आहेत. आकर्षक ऑफर्स आणि विश्वासार्ह सेवेमुळे जळगाव व सावदा येथील भंगाळे गोल्ड हेच सुवर्णप्रेमींसाठी विश्वासाचे पहिले ठिकाण ठरत आहे.





