खान्देशजळगांवदेश-विदेशशासकीय

महाराष्ट्र वनविभागात विविध पदांसाठी भरती; अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर

महाराष्ट्र वनविभागात विविध पदांसाठी भरती; अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर

ठाणे (प्रतिनिधी) – वन्यजीव विभागांतर्गत तानसा, कर्नाळा, फणसाड आणि सुधागड या अभयारण्यात वन्यजीव अभ्यास, अधिवास विकास व ग्राम परिस्थितीकीय विकासाची कामे प्रभावीपणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र वनविभागाने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून ही संधी वन्यजीव संवर्धनाशी निगडित क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे.

उपवनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालय, ठाणे यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण १४ पदांची भरती होणार असून पदनिहाय पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

◾ भरती विभाग : महाराष्ट्र वनविभाग, उपवनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालय, ठाणे
◾ पदे : वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, वास्तुविशारद, कायदेशीर सल्लागार, ग्राफिक डिझायनर, उपजीविका तज्ञ, रॅपिड रेस्क्यू टीम सदस्य
◾ शैक्षणिक पात्रता : दहावी ते पदव्युत्तर पदवीधर (पदनिहाय आवश्यक अर्हता लागू)
◾ वेतन श्रेणी : ३५,००० ते ६०,००० रुपये मानधन
◾ निवड प्रक्रिया : मुलाखत
◾ अर्ज पद्धत : ऑनलाइन (ई-मेल – defwlthane@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button