खान्देशशिक्षण

इकरा शाहीन विद्यालयला ‘AI-Ready School’ म्हणून मान्यता

इकरा शाहीन विद्यालयला ‘AI-Ready School’ म्हणून मान्यता

आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाकडे महत्त्वाचे पाऊल; विद्यार्थ्यांना भविष्याची तयारी

जळगाव : इकरा शाहीन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजसाठी अभिमानाचा क्षण ठरला असून, शाळेला अधिकृतपणे “AI-Ready School” म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. शाळेत यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या “AI Classroom Foundation Course” मुळे ही मान्यता मिळाली आहे.
विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्ये, चिकित्सक विचारसरणी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचे ज्ञान देण्यासाठी शाळा सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत शिक्षण मिळत असून भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ते सक्षम होत आहेत.

या उपक्रमासाठी माहिती व तंत्रज्ञान शिक्षक शेख फरहान रऊफ यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना सुपरवायझर शेख झाकीर बशीर, माजी प्राचार्य काझी जमीरुद्दीन तसेच प्राचार्य रियाज अहमद शहा यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, चेअरमन जफर शेख, डी.एड. चे चेअरमन अब्दुल रशीद शेख यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व सहकाऱ्यांचेही कौतुक करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button