खान्देशजळगांव

सभासद नाही तर फिटनेस नाही” सक्ती बंद करा; वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे RTO यांना निवेदन

सभासद नाही तर फिटनेस नाही” सक्ती बंद करा; वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे RTO यांना निवेदन

जळगाव | प्रतिनिधी स्वर्गीय आनंद दिघे कल्याणकारी मंडळाची सभासद फी बळजबरीने वसूल केली जात असल्याचा आरोप करत तसेच “सभासद नाही तर फिटनेस नाही” या कथित अन्यायकारक प्रकाराविरोधात वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्य (जळगाव जिल्हा शाखा) यांच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) मा. वर्मा यांना निवेदन सादर करण्यात आले.

महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज भाई सैय्यद यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष तनवीर खान यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. वाहन चालक व मालकांवर होत असलेला कथित अन्याय तात्काळ थांबवून संबंधित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
प्रमुख मागण्या
“सभासद नाही तर फिटनेस नाही” ही बेकायदेशीर सक्ती तात्काळ बंद करण्यात यावी.
वाहन फिटनेस प्रक्रियेसाठी कोणत्याही कल्याणकारी मंडळाचे सभासदत्व अनिवार्य नसल्याबाबत लेखी आदेश जारी करण्यात यावेत.
संघटनेने इशारा दिला आहे की, वाहन चालक व मालकांवरील अन्याय थांबविला गेला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी शेख नबी शेख करीम कुरेशी (शहर संपर्क प्रमुख), वसीम अली कलीम अली (जळगाव शहर संघटक), आसिफ खान हाजी साहेब (शहर सल्लागार), रिजवान खान (शहर सदस्य), जब्बार खान (शहर अध्यक्ष, वाहतूक आघाडी भाजप), संजय शिंदे (शहर संघटक), किरण दाभाडे (माजी शहर अध्यक्ष), मुश्ताक शाह (माजी शहर कार्यकारिणी सदस्य), तसेच तैसीफ शेख, फारुख तडवी, करीम शेख (राजू), मोहम्मद रफिक, रईस, कैलास अहिरे, इब्राहीम शेख, प्रवीण अहिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button