खान्देशजळगांव

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा

जळगांव रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुवारी, दि. २५ जून २०२६ रोजी लता मंगेशकर हॉल येथे इयत्ता सातवी, आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअर संधी, शैक्षणिक वाटचाल, व्यक्तिमत्त्व विकास तसेच भविष्यातील स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि ध्येय यांचा विचार करून योग्य करिअरची निवड करावी, तसेच सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करता येते, असे प्रतिपादन डॉ. पाटील यांनी केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयी जागरूकता निर्माण झाली.

कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येत असून, या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरविषयक जाणिवा अधिक व्यापक झाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button