वीज कोसळून तपत कठोराच्या तरुणाचा मृत्यू

वीज कोसळून तपत कठोराच्या तरुणाचा मृत्यू
भुसावळ । प्रतिनिधी । तालुक्यातील तपत कठोरा परिसरात शेतात काम करत असताना वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खिलेश उर्फ साहिल किशोर तायडे (वय २१) हा आपल्या वडिलांसोबत शेतात गेला होता. काम आटोपल्यानंतर वडिलांनी त्याला घरी जाण्यासाठी आवाज दिला. मात्र, तो खाली बसल्याच्या
अवस्थेत दिसत असल्याने वडील त्याच्याजवळ गेले असता त्याच्या अंगावर वीज कोसळल्याचे निदर्शनास आले. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. साहिल हा किशोर शिवाजी तायडे (कोळी) यांचा मोठा मुलगा होता. त्याच्या अकाली निधनामुळे तायडे-कोळी परिवारासह संपूर्ण तपत कठोरा गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, कुटुंबीय व नातेवाईक असा मोठा परिवार आहे. या घटनेबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे





