खान्देशजळगांवसामाजिक

प्रभाग क्रमांक २ मध्ये रविवारी एसआयआर विशेष शिबिराचे आयोजन

प्रभाग क्रमांक २ मध्ये रविवारी एसआयआर विशेष शिबिराचे आयोजन

मतदार यादी विशेष पुनरिक्षणासाठी बीएलओ राहणार उपस्थित; नागरिकांना फॉर्म भरण्याचे आवाहन

जळगाव | प्रतिनिधी

मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षण (एसआयआर) अभियानाअंतर्गत प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांसाठी रविवारी (दि. १९ जुलै) अमन चौक, छत्रपती शिवाजीनगर येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मजहर पठाण फ्रेंड सर्कल आणि अमन चौक ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात प्रभाग क्रमांक २ मधील सर्व बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहणार आहेत. ज्या नागरिकांचे एसआयआरसाठीचे अर्ज अद्याप भरायचे किंवा जमा करायचे राहिले आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून अर्ज भरावेत किंवा जमा करावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

एसआयआर प्रक्रियेसाठी उपलब्ध कालावधी मर्यादित असल्याने नागरिकांनी विलंब न करता स्वतःची जबाबदारी ओळखून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आयोजकांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button