खान्देशगुन्हेजळगांव

मेहुणबारे पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, काडतुसे व तलवार जप्त

मेहुणबारे पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, काडतुसे व तलवार जप्त

पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही कार न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न; पाठलाग करून दोघांना अटक

चाळीसगाव : जळगाव जिल्ह्यातील मेहुणबारे पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून भरधाव कारचा पाठलाग केला. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही कार न थांबवता संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी काही अंतरावर कार अडवून दोघांनाही ताब्यात घेतले.

कारची झडती घेताच शस्त्रसाठा उघड

संशयितांच्या कारची कसून झडती घेतली असता त्यामध्ये एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि धारदार तलवार आढळून आली. पोलिसांनी सर्व शस्त्रे तातडीने जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची एकूण किंमत २६ हजार रुपयांहून अधिक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

या कारवाईनंतर परिसरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दोन्ही संशयितांविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button