खान्देशगुन्हेजळगांवसामाजिक

मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिर उत्साहात संपन्न

मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिर उत्साहात संपन्न

गरजू रुग्णांनी घेतला लाभ; आयोजक व सहकाऱ्यांच्या सेवांचे कौतुक

जळगाव,  : खिदमत-ए-इन्सानियत फाउंडेशनच्या वतीने तसेच डॉ. इक्बाल स्पोर्ट्स अंजुमन फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने डॉ. इक्बाल हॉल, इक्बाल कॉलनी, मेहरुण, जळगाव येथे मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात हाफिज इब्राहिम यांच्या कुरआन पठणाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुफ्ती हारून नदवी होते, तर सूत्रसंचालन आसिफ हारून सर यांनी केले. शेवटी शकील सर यांनी आभार प्रदर्शन केले.
शिबिरात डॉ. डी. आर. महाजन (फिजिशियन), डॉ. गोपाल अरुण ढोलप (न्यूरोलॉजी तज्ज्ञ), डॉ. सिद्धांत अरुण ढोलप (बालरोग तज्ज्ञ) तसेच डॉ. हिना बशीर चौधरी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ) यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले.

शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर तसेच इतर आवश्यक आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. गरजू रुग्णांना उपलब्ध औषधेही मोफत देण्यात आली. तसेच शिफा लॅबच्या वतीने विविध रक्त तपासण्यांवर विशेष सवलत देण्यात आली.
यावेळी डॉ. करीम सालार, खलील पठाण, इब्राहिम मूसा पटेल, शाकीर भाई, अक्षय वंजारी, प्रशांत नायक, सलीम इनामदार, अनीस शाह, रागिब अहमद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित वक्त्यांनी सांगितले की, अशा समाजोपयोगी वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे.

शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल खिदमत-ए-इन्सानियत फाउंडेशन, डॉ. इक्बाल स्पोर्ट्स अंजुमन फाउंडेशन, सर्व डॉक्टर, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button