खान्देशजळगांवसामाजिक

भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे शिवाजीनगरात रक्तदान शिबिर; ३५ रक्तदात्यांचे योगदान

भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे शिवाजीनगरात रक्तदान शिबिर; ३५ रक्तदात्यांचे योगदान

फळवाटपातून सामाजिक बांधिलकीचा संदेश; खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांची उपस्थिती

जळगाव | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप अल्पसंख्याक मोर्चा महानगर जळगावच्या वतीने शिवाजीनगर येथे रक्तदान शिबिर आणि फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ३५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. रक्तदानासोबतच गरजू नागरिकांना फळवाटप करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा), महानगर अध्यक्ष दीपक सुवर्णशी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, दीपक परदेशी, राजेंद्र मराठे, नगरसेवक विजय बांदल यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महानगर अध्यक्ष परवेज पठाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमाला प्रदेश सदस्य जहांगीर अहमद खान, उपाध्यक्ष वसीम खान, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अफसर शेख अब्दुल हमीद शेख, सरचिटणीस इरफान शेख, नगरसेवक जाकीर पठाण, माजी अध्यक्ष नूर महोमद शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

यावेळी इद्रिस शेख, गुड्डू भाई पठाण, वसीम शेख, अर्शद पठाण, जावेद खान, अफसर शेख, सलमान सईद खान, जुबेर अहमद, कासिफ आरिफ शेख, राजू भाऊ मराठे, संजय शिंदे, राजू शेख, शेख मुनाफ, शेख नबी आणि शेख सईद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड बँकेच्या डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी आवश्यक वैद्यकीय सेवा व सहकार्य केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे आयोजकांच्या वतीने कौतुक करण्यात आले.

रक्तदान हे गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारे सामाजिक कार्य असून, वाढदिवसासारख्या प्रसंगांना समाजोपयोगी उपक्रमांची जोड देणे ही सामाजिक बांधिलकीची सकारात्मक दिशा असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. शिवाजीनगरातील या उपक्रमाला नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button