
जामनेर तालुक्यातून शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणासाठी प्रा.समीर घोडेस्वार व प्रा.सचिन गडाख यांची सुलभकपदी निवड
जामनेर: शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षणाचे प्रशिक्षणासाठी इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील हिंदी तथा क्रीडा विषयाचे उपशिक्षक समीर विष्णू घोडेस्वार व भौतिकशास्त्र विषयाचे उपशिक्षक सचिन तानाजी गडाख यांची सुलभकपदी निवड गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जामनेर यांच्या आदेश पत्राद्वारे देण्यात आली.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार राज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता विषयक विविध उपक्रमाची अंमलबजावणीसाठी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण व पर्यवेक्षीय यंत्रणासाठी प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या मार्फत जिल्हास्तरावर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण दि. ३ ते ७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान रोज सकाळी १० ते ५ वा. कालावधीमध्ये जी एच रायसोनी महाविद्यालय, शिरसोली रोड जळगांव येथे होणार आहे.
शिक्षक क्षमतावृद्धि प्रशिक्षण निवडीबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपमुख्याध्यापक एस एन चवरे, उपप्राचार्य प्रा.के एन मराठे, पर्यवेक्षक प्रा.के डी निमगडे, पर्यवेक्षक जी जी अत्तरदे, प्रा.डी झेड गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.