खान्देशगुन्हेजळगांवसामाजिक

भाजपा कार्यालयात श्री गणेशाची महाआरती भक्तिमय वातावरणात संपन्न

भाजपा कार्यालयात श्री गणेशाची महाआरती भक्तिमय वातावरणात संपन्न

जळगाव | प्रतिनिधी

गणेशोत्सवानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या जळगाव येथील कार्यालयात श्री गणेशाची महाआरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी गणरायाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

डॉ. योगिता बाविस्कर, डॉ. सोनल बोरोले, डॉ. यशश्री तायडे आणि सहायक अधिसेवक तुषार पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. विधिवत पूजा-अर्चा आणि आरतीनंतर उपस्थितांनी गणरायाचे दर्शन घेतले.

या कार्यक्रमाला जी. एम. फाउंडेशनचे कार्यालय प्रमुख उदय भालेराव तसेच गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे आरोग्यदूत पै. शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित भाविक आणि कार्यकर्त्यांनी भक्तिभावाने आरतीत सहभाग घेतला.

महाआरतीनंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. गणेशभक्तीने भारलेल्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे भाजपा कार्यालय परिसरात उत्साह आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button