इतर

नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन

नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन

गोव्यातील निवासस्थानी कार्डियाक अरेस्ट; ४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतरही डॉक्टरांना वाचवता आले नाही

मुंबई, प्रतिनिधी : आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी पहाटे त्यांना अचानक कार्डियाक अरेस्ट आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले; मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

नाना पाटेकर यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनीही दुजोरा देत पुष्टी केली आहे. नानांच्या अचानक जाण्याने मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून, त्यांच्या चाहत्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

नाना पाटेकर यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षातून घडले. बालपणीची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडिलांचा व्यवसाय बंद पडल्यानंतर कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटाचा त्यांनी जवळून अनुभव घेतला. अवघ्या तेराव्या वर्षी उदरनिर्वाहासाठी चित्रपटांचे पोस्टर रंगविण्याचे काम त्यांनी केले. या संघर्षातूनच पुढे त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

अभिनयातील नैसर्गिक सहजता, प्रभावी संवादफेक आणि व्यक्तिरेखेत पूर्णपणे सामावून जाण्याची क्षमता यामुळे नाना पाटेकर यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘तिरंगा’, ‘वेलकम’ यांसह अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

वैयक्तिक आयुष्यातील अनेक धक्क्यांनीही त्यांना घडवले. न्यूनगंडावर मात करत त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. पहिल्या मुलाच्या निधनाचा मोठा आघातही त्यांच्या आयुष्यात आला. संघर्ष, वेदना आणि अनुभव यांचे प्रतिबिंब त्यांच्या अभिनयातून सातत्याने उमटत राहिले.

नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, परखड आणि प्रभावी कलाकार गमावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button