शेखपुरा मुस्लिम पंच कमेटी तर्फे पोलीस प्रशासनाचा सत्कार !
खान्देश टाईम्स न्यूज l मुखतार शेख l सावदा l मुस्लिम समाजाचे सण ईद मिलाद चा जुलूस शांततेत पार पडल्याने सावदा येथे शेखपुरा मुस्लिम पंच कमेटी तर्फे पोलीस प्रशासनाचा जाहीर सत्कार करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की नुकतेच झालेल्या गणेश विसर्जन मिरवणूक व ईद मिलादुन्नबी जुलूस शांततेत पार पडला मुक्ताईनगर तालुक्यातील डि वाय एस पी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. सावदा पोलिस ठाण्याचे ए पी आय जालिंदर पळे व पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंदू मुस्लिम यांच्या धार्मिक उत्सव संपन्न करणे साठी दिवस रात्री एक करून मेहनत घेतली म्हणून सावदा शेखपुरा चे मुस्लिम पंच कमेटी यांनी असे नियोजन केले कि आपण सावदा पोलिस प्रशासनाला सम्मानित करणे आपले कर्तव्य आहे तरी शेखपुरा मुस्लिम पंच कमेटी अध्यक्ष शेरखान यांनी प्रथम सावदा पोलिस ठाण्याचे ए पी आय जालिंदर पळे यांच्या सत्कार केला तसेच पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्या सत्कार बडा आखाडाचे मुस्लिम पंच कमेटी अध्यक्ष अख्तर हुसेन यांनी केल. कार्यक्रमचे सुत्र संचालन असलम खान यांनी केले तसेच सावदा पोलिस ठाण्याचे ए पी आय जालिंदर पळे यांनी मनापासून आभार व्यक्त केले. तसेच आलेल्या सर्व सावदा मुस्लिम धर्माचे पंच कमेटी व जामा मशजिद कमिटी यांच्या सुध्दा सत्कार करण्यात आले शेखपुरा मुस्लिम पंच कमेटी अध्यक्ष शेरखान व उपाध्यक्ष सईद सर सचिव मुख्तार शेख खजिनदार सय्यद अज़हर, फिरोज खान, अज़हर शेख, फिरोज शेख, व सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले