फैजपूरः- अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी यावल तालुक्यातील तीन संतांना नुकतेच आमंत्रण मिळाले आहे. अयोध्या येथे भव्य दिव्य असे श्रीरामांचे अद्वितीय भव्य मंदिर बांधकाम करण्यात आले. दि.२२ जानेवारी रोजी श्रीराम राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक आनंदायक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष तथा सतपंथ मंदिर संस्थान गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज, अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा श्री वृंदावन धाम पाल येथील श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज, स्वामीनारायण मंदिर सावदा येथील कोठारी शास्त्री भक्तीकिशोर दासजी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याआधी राम जन्मभूमी मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी एकमेव महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज यांना आमंत्रण होते. महाराष्ट्रासाठी ही खूप गौरवाची व आनंददायक भूषणावह बाब आहे. परमपूज्य जनार्दन हरि जी महाराज हे १३ जानेवारीला रोजी अयोध्या येथे प्रस्थान करणार आहेत.