चाळीसगाव ;- शहरातील न्यू श्री काजू उद्योग नावाच्या ड्रायफूट दुकानातून अज्ञात चोरटयांनी सुमारे २ लाख ३६ हजारांचा ड्रायफूट माल आणि रोकड लांबविल्याचा प्रकार ९ रोजी रात्री साडे नऊ ते १० रोजीच्या सकाळी ५ वाजेदरम्यान घडली याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, हिरलाल निंबा चौधरी वय २५ यांचे खर्जाची नका गणेश कॉलनी येथे राहत्या घराच्या खाली डरफुटीचे होलसेल दुकान असून चोरटयांनी ९ रोजीच्या रात्री साडेनऊ ते १० रोजीच्या पहाटे ५ वाजेच्या दरम्यान घडली असून चोरटयांनी २ लाख ३६ हजारांचा ड्रायफूट माल आणि रोकड लंपास केली. याप्रकरणी हिरालाल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.