इतरखान्देशजळगांवदेश-विदेशराजकीयशासकीयसामाजिक

ब्रेकिंग : मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य

मुंबई ;- मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहेत. नवी मुंबईतून मुंबईत पोहचण्यापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. दरम्यान जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आता शासकीय विहित नियमानुसार अंमलबजावणी होईल, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. आता शासकीय विहित नियम असतात, त्यानुसार त्या निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असे घडले की आपण 37 लाख कुणबी प्रमाणपत्र दिले होते. परंतु आता आणखी ही 50 लाखांच्यावर जाणार आहेत.

मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार होते. मुंबई ठप्प होणे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन यंत्रणा कामाला लावली. आता मनोज जरांगे यांनीही मान ठेवला पाहिजे. त्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना भेटून आनंद साजरा करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button