भडगाव परिसरातील गावागावात महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांचे रांगोळ्या काढून केले भव्य स्वागत..
खान्देश टाइम्स न्यूज l प्रतिनिधी l भडगाव तालुक्यातील वसंतवाडी, आंचळगाव, धोत्रे, लोण, पिंपरखेड, वरखेड, अंजनविहिरे, आमडदे येथे प्रचार करताना प्रत्येक गावात घरासमोर शिवसेना पक्षाची निशाणी धनुष्यबाण व शिवसेना असे रांगोळ्या काढून लिहिलेले पहावयास मिळाल्याने व गावात फिरताना गल्लोगल्ली काही महिलांनी स्वयंफुर्तीने घोषणा दिल्या ” धनुष्यबाणाचे बटन दाबून अमोल दादांना विजयी करा ” असा प्रतिसाद पाहून शिवसेना महायुतीचे उमेदवार अमोल पाटील हे भारावून गेले.
प्रत्येक गावात आमदार चिमणराव पाटील यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करीत नक्कीच अमोल पाटील यांना निवडून देऊ व आ.चिमणराव पाटील यांचा कार्याचा वसा असाच पुढे चालू राहील असा विश्वास गावकऱ्यांनी अमोल पाटील यांना दिला.
यावेळी प्रत्येक गावातील दिनकर हिलाल पाटील मा. जि.प. सदस्य, संजय भिकन पाटील ( मराठा आबा ) माजी सरपंच गिरड, विकास हिंमत पाटील मा.सरपंच, मधुकर पाटील, आनंदा पाटील ग्रा.प. सदस्य, नागराज कोळी वि.का.सो. सभापती, भिला पाटील ग्रा.प. सदस्य, दशरथ पाटील, भास्कर पाटील, अतुल महाजन, शांताराम पाटील, संदीप पाटील, राहुल पाटील, रोहिदास चौधरी, राहुल अशोक पाटील, भूषण पाटील, विकास पाटील, उज्वल भागवत पाटील मा. सरपंच अंतुर्ली, निलेश पाटील, अरुण पाटील सरपंच पिंपरखेड, सुधीर पाटील मा. सरपंच, राजू कोळी उपसरपंच, प्रशांत पाटील, सायबु पाटील, दगा पाटील, पिंटू पाटील, गोटा भाऊसाहेब पाटील , बाबा राठोड, धर्मा राठोड , भैय्या पाटील, संभाजी पाटील मा.पं.स. सभापती, पिरा बापू मा. सरपंच आमडदे, रावसाहेब भोसले दूध फेडरेशन जळगाव संचालक, गुलाब पाटील, रामलाल चौधरी मा. सरपंच मानकी, रवींद्र चौधरी सरपंच मानकी, शिवाजी पाटील मा. सरपंच बांबरुड, खेळकर अण्णा, शाम पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.