जळगाव– येथील आकाशवाणी चौकामध्ये चोरलेली दुचाकी घेऊन जाणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. शोएब हबीब शाह वय 25 राहणार मास्टर कॉलनी जळगाव असे या चोरट्याचे नाव आहे. म्हणजे कॉलेज समोर अफसर अहमद शेख मुनीर यांची दुचाकी क्रमांक 3893 चोरून नेल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी घडली होती या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करत असताना शोएब शहा त्याने दुचाकी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानुसार 22 नोव्हेंबर रोजी दुपारी आकाशवाणी चौकात सापळा रचून शोएब शहा याला अटक केली. त्याने आणखी दोन दुचाकी चोरीच्या काढून दिल्या. याप्रकरणी शोभेच्या विरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इरफान मलिक ,जितेंद्र तावडे, जितेंद्र राठोड ,जितेंद्र राजपूत ,हेमंत कळस्कर ,विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे,रवींद्र चौधरी, जुलाल सिंग परदेशी ,उमेश पवार आदींनी केली.