जळगाव -शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. विशाल श्यामलाल प्रजापत राज मालती नगर असे दुचाकी चोरट्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने जळगांव जिल्हयातील दुचाकी चोरीच्या गुन्हयामध्ये वाढ होत असल्याने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांनी जळगांव शहरातील शहर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांची बैठक घेवुन त्यांनी मार्गदर्शन करुन दुचाकी चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्य त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी गुन्हे शोध पथकातील सपोनि रामचंद्र शिकारे, सफौ. सुनिल पाटील, पोहेकॉ. उमेश भांडारकर, पोहेकॉ/सतिश पाटील, पोहेकॉ भास्कर ठाकरे, पोहेकॉ योगेश पाटील, पोहेकॉ किशोर निकुंभ, पोकॉ. अमोल ठाकुर, पोकॉ. राहुलकुमार पांचाळ, पोकॉ. प्रणय पवार अशांचे पथक तयार करुन पथकास दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या योग्य त्या सुचना दिल्या.
4 नोव्हेंबर रोजी जळगांव शहरातील भिकमचंद जैन नगर येथुन स्पेलंडर प्लस MH-१९ CP- १३४९. ही दुचाकी चोरीस गेलेली होती त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा तपास चालु असतांना गुप्त बातमीदारां मार्फत मिळवुन सुरत रेल्वे गेट जवळील मालधक्का जवळ जळगांव शहर पो.स्टे.च्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचुन वरील चोरीस गेलेल्या दुचाकीसह आरोपी विशाल शामलाल प्रजापत रा. राज मालती नगर जळगांव याला ताब्यात घेतले असता त्याने आणखी दोन दुचाकी चोरल्याची माहिती दिली.