यावल : एका दुचाकी स्वराला अडवून त्याच्याकडून दहा हजाराची रोकड लंपास केल्याची घटना 16 रोजी किनगाव ते यावल रस्त्यावर घडली होती. यात दोन संशयितांना पोलिसांनी अटक करुन शनिवारी दोघांना यावल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
तालुक्यातील भालशिवपिंप्री येथील सरपंच मोहन एकनाथ सपकाळे व शिवलाल भगवान सपकाळे हे चोपडा येथून १६ नोंव्हेंबर रोजी रात्री यावलकडे येत होते. दरम्यान, किनगावजवळ त्यांच्या दुचाकी (एमएच १९, बीएल- ००५१) ला मागून येणाऱ्या दुचाकी (एमएच- २८, एडब्ल्यू-२३८) वरील व्यक्तीने लाथ मारली. तसेच त्यांना थांबवून हत्याराचा धाक दाखवून पैशांची मागणी करत ठार मारण्याची धमकी दिली होती. धमकी देऊन त्यांनी मोबाईल व१० हजारांची रोकड लांबवून नेली होती. या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
पो.नि. प्रदी प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, परमेश्वर जाधाव यांनी त्या दुचाकी क्रमांकावरून मुळ मालकाचा शोध घेतला, तसेच सीसीटीव्ही फुटेज ही तपासले. त्यानंतर या गुन्ह्यातील संशयित फरहान शेख फारूख अहेमद (वय २४, रा. मिर्झानगर, इक्बाल चौक, बुलढाणा) व शेख राजिक शेख इसरार (वय २२, रा. डांगपुरा, यावल) या दोघांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. . तपास पोलिस उपनिरिक्षक सोपान गोरे, हवालदार परमेश्वर जाधव करत आहेत.