खान्देशगुन्हेजळगांव

नवीन कार घेऊन देण्याचे अमिष देत व्यावसायिकाला सव्वातीन लाखात गंडविले !

खान्देश टाइम्स न्यूज l ९ डिसेंबर २०२४ l

शहरातील एका व्यावसायिकाला नवीन कार घेऊन देण्याचे अमिष दाखवून तीन लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मनीषा कॉलनीत विक्रम मुणोत हे कुटुंबासह वास्तव्यास असून, त्यांचा जाहिराती प्रदर्शित करण्याचा व्यवसाय आहे. जाहिरातीच्या कामाच्या माध्यमातून त्यांची स्वीगी कंपनीच्या जळगाव कार्यालयातील एरिया मॅनेजर राकेश सुभाष बडगुजर यांच्याशी ओळख झाली होती.

नंतर दोघेही संपर्कात होते. तेव्हा बडगुजर यांनी मुणोत यांना संपर्क साधून कंपनी कोट्यातून कर्मचाऱ्यांना कमी किमतीमध्ये कार विक्री करते. त्यामुळे तुम्हाला नवीन कार घेऊन देतो असे सांगून त्यांनी मुणोत यांचा विश्वास संपादन केला. मुणोत यांनी मे महिन्यात बडगुजर याला ३ लाख २४ हजार रुपये बँकेद्वारे पाठवले. मात्र, वारंवार कारची विचारणा केल्यावर बडगुजर याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. अखेर कार खरेदी करून देण्यास नकार दिल्याने मुणोत यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.  रविवारी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून राकेश सुभाष बडगुजर (४२, रा. मनोकामना निवास, पंचतारानगर, आकुर्डी, पुणे) याच्याविरुद्ध जळगावात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button