
जीवन आणि मृत्यू हे ईश्वराच्या हातात – डॉ. अब्दुल करीम सालार
सालार फाउंडेशनतर्फे हेल्मेट वाटप
जळगाव प्रतिनिधी I
येथील ईकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगाव येथील विद्यार्थी विद्यार्थिनी ज्यांच्या कडे दोन चाकी वाहने आहे आणि ज्यांच्याकडे लायसन्स आहे, अशाच विद्यार्थ्यांना, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आवाहनाला साथ देऊन “रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत ” “सालार फाउंडेशन” यांच्या तर्फे ईकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांच्या तर्फे हेल्मेटचे वाटप करण्यात आले. त्यांनी सांगितले की जीवन आणि मृत्यू हे ईश्वरा च्या हातात आहे. परंतु आपली काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. म्हणून वाहनाचा उपयोग करताना आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून हेल्मेट सारखी वस्तू आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
यावेळी नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माननीय मनोरे साहेब हे उपस्थीत होते. यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर इकबाल शाह, मजीद सेठ जकरिया, प्रभारी प्राचार्य डॉक्टर चांदखान, उपप्राचार्य डॉ. वकार शेख, डॉक्टर तनवीर खान तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने उपस्थिती होती.