इकरा बी.एम. जैन उर्दू प्राथमिक शाळेचे यश

इकरा बी.एम. जैन उर्दू प्राथमिक शाळेचे यश
जळगांव प्रतिनिधी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्याकडून रावेर येथे जिल्हास्तरीय ज्युनिअर अॅथेलिटीक्स स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. सदर स्पर्धेत जिल्हयातील विविध शाळांतील विदयार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यात इकरा शिक्षण संस्था, जळगांव संचलित बी.एम. जैन उर्दू प्राथमिक शाळेतील 08 वयोगटात स्टॅन्डींग ब्रान्ड जम्प मध्ये अदी आमिल शेख याने प्रथम पटकविला तर 50 मिटर रनिंगमध्ये दिव्तीय क्रमांकाने आला. तसेच 10 वर्षे गटातून स्टॅन्डींग ब्रान्ड जम्प मध्ये इनाया अमील शेख ही विदयार्थीनी प्रथम आणि 50 मिटर रनिंग मध्ये व्दितीय आली.
हमजा जुबेर शेख याने गोळाफेक मध्ये प्रथम क्रमांक पटकविला, हाशिम हारून तांबोली हा विदयार्थी स्टॅन्डींग ब्राड जम्प मध्ये प्रथम आला. सिदरा सलमान मिस्ती गोळा फेक व्दितीय आली.
या सर्व विदयार्थ्यांची निवड पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा 2025 साठी झाली आहे. या सर्व विदयार्थ्यांचे मुख्याध्यापक असलम खान महेबुब खान, चेअरमन एस. एम. जफर तसेच संस्थाध्यक्ष डॉ. अ.करीम सालार यांनी कौतूक केले. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.