
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक
जळगाव प्रतिनिधी
शेतात एकटी असल्याचा फायदा घेत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदा उर्फ भैया वाणी रा. दापोरा जि.जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना संशयित आरोपी आनंदा वाणी याने अल्पवयीन मुलीचा हात पकडून तोंड दाबून तिचा विनयभंग केला आहे. हा प्रकार पिडीत मुलीने नातेवाईकांना सांगितला. पिडीत मुलीने एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून संशयित आरोपी आनंदा उर्फ भैया वाणी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहे.