सामाजिक कार्यकर्ते असिफशहा बापू यांचा जिल्हा पोलिसांकडून गौरव; तांबापुरा परिसरात सन्मान समारंभ

सामाजिक कार्यकर्ते असिफशहा बापू यांचा जिल्हा पोलिसांकडून गौरव; तांबापुरा परिसरात सन्मान समारंभ
जळगाव (प्रतिनिधी): तांबापुरा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते असिफशहा उर्फ असिफ बापू यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस प्रशासनास वेळोवेळी दिलेल्या सहकार्याची दखल जळगाव जिल्हा पोलीस दलाने घेतली आहे. त्यांच्या या समाजपयोगी कार्याबद्दल जळगावचे मा. पोलीस अधीक्षक श्री. माहेश्वर रेड्डी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
या गौरवाच्या निमित्ताने तांबापुरा परिसरातील स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने असिफ बापू यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते.
सत्कार करणाऱ्यांमध्ये पुढील मान्यवरांचा सहभाग होता:
जबार भाई, इस्माईल खान, अहमद खान, सुमित सानप, बिकन काकर, बाबा खान, रिहान काकर, नाना भाऊ, इकबाल भाई, तोसिफ भाई, कलीम काकर आदींसह परिसरातील अनेक नागरिकांनी असिफ बापू यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात सामाजिक सलोखा आणि पोलीस-जनतेतील सौहार्द वृद्धिंगत झाल्याचे चित्र दिसून आले.