जळगाव ;- शासकिय पदमालय रेस्ट हाऊस येथे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिलदादा पाटील यांचा मराठासेवा संघाचे वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माॕसाहेब यांची मुर्ती,शाल व पुश्पगुच्छ देऊन शिवसत्कार करण्यात आला.व भावी कारकिर्दिसाठी शिवशुभेच्छा देण्यात आल्यात. .यावेळी झालेल्या बैठकीत सामाजिक पातळीवरील चर्चा खेळीमेळीत करण्यात आली.
ना.अनिल यांनी मंत्री पदासाठी झालेली अनपेक्षित निवड व मंत्री पदाची शपथ घेतेवेळीचा आश्चर्य कारक अनुभव कथन केला. .कॕबिनेट मंत्री झालेवर देखील अभ्यास पुर्ण व साधेपणाने सर्वांशी वागणूक यावेळी सर्वांना भावली आहे.बैठकीत श्रीराम अॕग्रोचे श्रीराम पाटील,सातपुडा आॕटोचे संचालक किरण बच्छाव,धिरेंद्र पाटील, मराठासेवा संघाचे प्रदेश ऊपाध्यक्ष सुरेंद्र पाटील,विभागिय कार्याध्यक्ष रामदादा पवार, विभागिय अध्यक्ष सुरेश पाटील,महानगराध्यक्ष इंजि हिरामण चव्हाण ,महानगर सचिव चंद्रकांत देसले,महानगर ऊपाध्यक्ष इंजि सचिन पाटील आदि मान्यवर पदाधिकारी ऊपस्थित होते.