
गांधी विचार परीक्षेत झांबरे विद्यालयाचा केतन गिरीश पाटील जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
जळगाव- ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीचा केतन गिरीश पाटील हा विद्यार्थी गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.तर हर्ष शिंपी, श्रीनिधी साधूराव तागड, मानवी अरविंद पाटील विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. विद्यालयातील एकूण साडेआठशे विद्यार्थी गांधी विचार परीक्षेला प्रविष्ट झाले होते. विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका पर्यवेक्षक, आणि सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी अभिनंदन केले.




