खान्देशजळगांव

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण नियुक्ती,पत्रकारांचे प्रश्न व संघटन बळकटीकरणावर भर

जळगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना एकत्रित करून पत्रकारितेला बळकटी देणाऱ्या गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या केंद्रीय समितीच्या आदेशानुसार पाडळसरे ता अंमळनेर येथील लोकमतचे पत्रकार जिभाऊ वसंतराव दिलीपचंद पाटील यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती दिनांक १ फेब्रुवारी २०२६ पासून ३१ मार्च २०२७ पर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे.पत्रकार संघाच्या नियम व अटींच्या अधीन राहून ही जबाबदारी संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम व संस्थापक महासचिव भगवान सोनार यांच्या आदेशानुसार सोपविण्यात आली आहे,

पत्रकार संघाच्या विस्तार, संघटन बळकटीकरण आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना एकत्रित मंच उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव जिभाऊ पाटील यांची ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील यांच्या पत्रकारिता क्षेत्रात असलेला प्रदीर्घ अनुभव व कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करत संघाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.

वसंतराव जिभाऊ पाटील याच्या नियुक्तीबद्दल पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र व्ही. कदम, संस्थापक महासचिव भगवान सोनार, संस्थापक उपाध्यक्ष रविंद्र पवार, केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी, ललित खरे, वीर गुर्जर सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष पत्रकार हेमंत पाटील व जेष्ठ पत्रकार मंगल बी पाटील, चेतन निंबोळकर, अजय भामरे यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वसंतराव जिभाऊ पाटील यांच्या नियुक्तीच्या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण पत्रकारितेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास नरेंद्र कदम आणि भगवान सोनार यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button