इतर

गिरीश महाजन यांना धक्का? जळगावातील भाजपच्या तरुण कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

गिरीश महाजन यांना धक्का? जळगावातील भाजपच्या तरुण कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या जळगावातील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश आमदार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.

मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात या तरुण कार्यकर्त्यांचे भगवा पट्टा परिधान करून स्वागत करण्यात आले. जळगावच्या विकासासाठी आणि राज्य सरकारच्या धोरणांवर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याची भावना यावेळी नव्या सदस्यांनी व्यक्त केली.

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये भुषण भोळे, राहुल पाटील, प्रशांत कोळी, विशाल महाजन, महेश पाटील, मुकेश पाटील, गणेश बच्छाव, प्रशांत चौधरी, राझिक पटेल, ओम बारी, रंजन पाटील, चेतन चौधरी, अक्षय भडांगे, सुयोग गुजर, विकास ठाकरे, जयेश पाटील, सागर पाटील, लोकेश पाटील, भावेश पाटील, दीपक कोळी आणि तौफिक खान यांचा समावेश आहे.

या पक्षप्रवेशामुळे जळगाव शहरातील राजकीय समीकरणांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः भाजपशी संबंधित सक्रिय तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेनेची वाट धरल्याने स्थानिक राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या पक्षप्रवेशाकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि जळगाव शहरातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात असून, पुढील काळात त्याचे परिणाम काय होतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button