खान्देशगुन्हेजळगांव

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; सावदा पोलिसांकडे निवेदन सादर

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; सावदा पोलिसांकडे निवेदन सादर

सावदा (प्रतिनिधी : अजहर खान)

दिल्ली येथील नाजिया इलाही खान यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सावदा शहरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सुन्नी पंथीय मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी, रझवी ग्रुपचे सदस्य तसेच शहरातील विविध मशिदींचे ट्रस्ट व पदाधिकारी यांनी सावदा पोलीस स्टेशन येथे दि. २४ जून रोजी निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, इस्लाम धर्माचे पवित्र प्रेषित हजरत मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) तसेच उम्मुल मोमिनीन हजरत आयशा (रजि.) यांच्याबाबत कथित स्वरूपात आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्याकडे करण्यात आली. तसेच सामाजिक सलोखा, शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक ती कायदेशीर पावले उचलावीत, अशीही विनंती करण्यात आली आहे.

या वेळी कादिर हाजी, इरफान शेख, लुकमान, नाजिम भाई, पत्रकार युसूफ शाह, फरीद शेख, अजहर खान, मुख्तार भाई, अज्जू पत्रकार, शेरा भैया, बाबू मेंबर, कलीम जनाब, निसार अहमद, कमरुद्दीन भाई, आबिद मोमीन, वसीम शेरा, रमजान भाई, सैयद सोनू, नवीद खान, कलीम भाई, दानिश खान यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, मशिदींचे ट्रस्टी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button