खान्देशजळगांव

सावद्यातील रमाबाई बुद्ध विहाराच्या नूतनीकरणाची मागणी

दलित वस्ती सुधार योजनेतून निधी देण्याबाबत नगरसेवक विशाल तायडे यांचे निवेदन

सावद्यातील रमाबाई बुद्ध विहाराच्या नूतनीकरणाची मागणी

दलित वस्ती सुधार योजनेतून निधी देण्याबाबत नगरसेवक विशाल तायडे यांचे निवेदन

सावदा |  मुख्तार शेख

सावदा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील रमाबाई बुद्ध विहाराच्या नूतनीकरणासाठी दलित वस्ती सुधार योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बौद्ध धर्म पंच ट्रस्ट आणि नगरसेवक विशाल तायडे यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाला बुधवारी (१ जुलै) निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सुमारे ५० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले रमाबाई बुद्ध विहार सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, भिंती आणि छत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजाच्या बैठका आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यास नागरिक घाबरत आहेत.

नगरसेवक विशाल तायडे यांनी संबंधित पंच ट्रस्टला विश्वासात घेऊन तसेच नगरसेविका सीमा वेडू लोखंडे आणि संगीता संजय तायडे यांच्या सहकार्याने नगरपालिका स्तरावर विशेष बैठक आयोजित केली. यानंतर मुख्याधिकारी भूषण वर्मा आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा रेणुका पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनाद्वारे रमाबाई बुद्ध विहाराचे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत तातडीने नूतनीकरण करण्यात यावे, जेणेकरून समाजबांधवांना सुरक्षित आणि सुसज्ज धार्मिक व सामाजिक केंद्र उपलब्ध होईल, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर देविदास सिताराम लोखंडे, सिद्धार्थ किटकुल बडगे, बाबुराव गोंडू तायडे, सुखदेव हिरामण तायडे, भिमराव हिरामण सपकाळे, अशोक गंभीर बडगे, सतीश मधुकर लोखंडे, बबन बालू बडगे, प्रकाश देवचंद तायडे, भिमराव गरबड लोखंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button