खान्देशगुन्हेजळगांवराजकीयशासकीयसामाजिक

रक्षाताई खडसे यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; मुक्ताईनगरात कठोर कारवाईची मागणी

रक्षाताई खडसे यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; मुक्ताईनगरात कठोर कारवाईची मागणी

भाजप पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

भाजपच्या नेत्या तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणी संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात सोमवारी (३ ऑगस्ट) मुक्ताईनगरचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी एका मोबाईल संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर आणि विविध डिजिटल माध्यमांवर व्हायरल झाली. या संभाषणात नंदुरबार येथील विजय चौधरी नावाच्या व्यक्तीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी कथितरीत्या अश्लील, आक्षेपार्ह आणि मानहानीकारक भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारची विधाने केवळ एका लोकप्रतिनिधीचा अपमान नसून सार्वजनिक जीवनातील महिलांबाबत चुकीचा संदेश देणारी आहेत. त्यामुळे भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर लागू कायद्यांनुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे निवेदन भाजप तालुका सरचिटणीस अतुल महाजन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button