इतर

खिशातील रोकड लांबवणारी टोळी ५ तासांत जेरबंद; जळगाव शहर पोलिसांची कामगिरी

खिशातील रोकड लांबवणारी टोळी ५ तासांत जेरबंद; जळगाव शहर पोलिसांची कामगिरी

​शाहू कॉम्प्लेक्स परिसरातील घटना; २ संशयितांसह एका अल्पवयीन बालकाला गेंदालाल मिल भागातून अटक

​प्रतिनिधी | जळगाव:
शाहूनगर येथील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात एका वृद्धाच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरणाऱ्या तिघांचा जळगाव शहर पोलिसांनी पाच तासांच्या आत माग काढून त्यांना ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून चोरीस गेलेली १२ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून यात एका अल्पवयीन बालकाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
​एमआयडीसी भागातील म्हाडा कॉलनीत राहणारे अनिल राजमल कासट (वय ६२) हे २६ ऑगस्ट रोजी दुपारी शाहू कॉम्प्लेक्स परिसरात आले असताना अज्ञात भामट्यांनी त्यांच्या खिशातील रोकड लांबवली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणावरून शहीदखान नजीरखान (वय २७), समीर खान मजीदखान (वय ३७) व एका १६ वर्षीय बालकाचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी गेंदालाल मिल परिसरात कारवाई करत एका दुकानाजवळून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत रोकड जमा केली. पोलीस निरीक्षक सागर शिंपी आणि उपनिरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही तत्पर कारवाई पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button