खान्देशगुन्हेजळगांव

राहत्या घरात २६ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

यावल तालुक्यातील साकळी येथील धक्कादायक घटना

राहत्या घरात २६ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

यावल तालुक्यातील साकळी येथील धक्कादायक घटना

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकळी गावातील शनी पेठ परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली असून, या घटनेमुळे साकळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विनोद जीवन बडगुजर उर्फ सोन्या (वय २६, रा. शनी पेठ, साकळी, ता. यावल) असे मृत तरुणाचे नाव आहे.

घरात घेतला गळफास मिळालेल्या माहितीनुसार, विनोद बडगुजर हा तरुण आपल्या घरी असताना त्याने अज्ञात कारणावरून राहत्या घरात गळफास घेतला. कुटुंबीय व परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला खाली उतरवून उपचारासाठी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले मृत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विनोद यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले. तरुणाने ऐन उमेदीच्या वयात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button