
SIR नोटीसधारकांसाठी विशेष मदत शिबिर; समस्यांच्या निराकरणासाठी MPJची पुढाकार
फैजपूरमध्ये ७ ऑक्टोबरला आयोजन; नाव व नोटीस तपासणीसह नागरिकांना मिळणार आवश्यक मार्गदर्शन

फैजपूर, प्रतिनिधी : मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर महाराष्ट्र (MPJ – शांती व न्यायाची मोहीम)च्या फैजपूर युनिटतर्फे SIR संदर्भातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष मदत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत इस्लामपुरा परिसरात रहीमभाई बेकरीवाले यांच्या घराजवळ आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये SIR प्रक्रियेसंदर्भात नागरिकांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेषतः ज्या नागरिकांना SIR संदर्भात नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांनी शिबिरात उपस्थित राहून आपले नाव तसेच प्राप्त झालेल्या नोटिसची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या SIR संदर्भातील अडचणी व शंकांची माहिती घेऊन त्यावर पुढील कार्यवाहीबाबत आवश्यक मार्गदर्शनही शिबिरात करण्यात येणार आहे.
या शिबिरात MPJ फैजपूर शहराध्यक्ष रहीमुद्दीन, उपाध्यक्ष इक्बाल खान, सदस्य सुनील लासूरे, सद्दाम कुरेशी तसेच BLO फरीद सर उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करणार आहेत.
अधिक माहितीसाठी MPJ फैजपूर शहराध्यक्ष रहीमुद्दीन यांच्याशी ९८२३७५२२२६ किंवा BLO फरीद सर यांच्याशी ८००७६१४८०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
SIR संदर्भात नोटीस प्राप्त झालेल्या नागरिकांनी निर्धारित वेळेत शिबिराला उपस्थित राहून या विशेष मदत सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन MPJ फैजपूर युनिटतर्फे करण्यात आले आहे.



