
श्रीराम रथोत्सवात चोरट्यांचा धुमाकूळ; १९ महिलांचे दागिने, २४ मोबाइल लंपास
३९ ग्रॅम सोन्यासह १० हजारांची रोकड चोरी; गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी साधला डाव

जळगाव : ग्रामदैवत श्रीराम संस्थानच्या रथोत्सवात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोठा हात साफ केला. रथोत्सव पाहण्यासाठी आलेल्या १९ महिलांच्या गळ्यातील सुमारे ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने, २४ मोबाइल आणि १० हजार रुपयांची रोकड असलेली पाच पाकिटे चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी शहर व शनिपेठ पोलीस ठाण्यात चोरीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
शनिवारी श्रीरामाचा रथोत्सव पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत चोऱ्या करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय होत्या. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असतानाही चोरट्यांनी हातसफाई केली.
दरम्यान, रथोत्सवादरम्यान चार महिलांचे सुमारे एक ग्रॅम सोन्याचे दागिने, नऊ मोबाइल आणि एक पाकीट चोरीला गेल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. पोलिसांनी शनिवारीच चोरट्यांच्या दोन टोळ्यांना जेरबंद केले होते.




